नगर -पिंपळगाव लांडगा येथील शहीद जवान राजेंद्र रावसाहेब लांडगे (वय: 38) यांच्यावर काल रात्री लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पिंपळगाव लांडगा येथील लांडगे मळ्यात रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसत्कार करण्यात आले. सजविलेल्या रथातून त्यांनी अंत्ययात्र काढण्यात आली. त्यांच्या मागे आदित्य (वय : 9) व आयुष (वय : 7) ही दोन मुले, पत्नी विमल, आई ताराबाई वडील रावसाहेब व आजोबा असा परिवार आहे.
मंगळवारी (ता. 22) ते शहीद झाले होते. लांडगे यांनी 2005मध्ये 81 आर्मड कोअरमध्ये लष्करात सेवा सुरु केली होती. मुंबईत सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच एनएसजी कमांडो म्हणून सेवेत होते.
दिल्ली येथे मागील वर्षी ट्रेनिंग दरम्यान त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे पुण्यातील कमांडो हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.