कासवंड येथे विवाहितेची आत्महत्या

पाचगणी – कासवंड (ता. महाबळेश्‍वर) येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली असून पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित म्हणून नोंद झाली आहे. अधिक माहिती अशी की, कासवंड येथील पूजा दयानंद पवार (वय 22) हिचे चार वर्षांपूर्वी दयानंद पवार यांच्याशी विवाह झाला होता. दयानंद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी सकाळी मी कामावर गेलो असता पूजा घरात एकटीच होती.

संध्याकाळी कामावरून आल्यावर पूजा घरात नसल्याचे आढळले. त्यामुळे तिची शेजारी, गावात व इतर सर्वत्र शोधाशोध केली परंतु ती सापडली नाही. त्यामुळे पूजा बेपत्ता असल्याची तक्रार पाचगणी पोलीस ठाण्यात दिली. परंतु सोमवारी शोध सुरु ठेवला असता पूजा कासवंड गावाच्या हद्दीत बेडीची माची शिवाराच्या ओघळीत बेशुद्धावस्थेत सापडली. पूजाने थायमेट हे विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे समजले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अधिक तपास पाचगणीच्या सपोनि. तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार एन. आर. कुलकर्णी व त्यांचे सहकारी करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.