Mario Zagallo Demise : खेळाडू म्हणून दोनदा आणि प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून प्रत्येकी एकदा विश्वचषक जिंकून देणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू मारियो झगालो यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. रविवारी जाहीर सभेने श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर मित्र-कुटुंबियांच्या उपस्थितीत ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेशन (CBF) च्या संग्रहालयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
झगालो हे पहिले असे व्यक्ती होते की, ज्यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक अशी भूमिका बजावताना प्रत्येकी एकदा संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष एडनाल्डो रोड्रिग्स यांनी शनिवारी पहाटे एका निवेदनात झगालो यांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांनी झगालोचे वर्णन फुटबॉलमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक म्हणून केले.
Auckland Classic 2024 : कोको गॉफ सलग दुसऱ्यांदा ठरली चॅम्पियन…
1958 आणि 1962 मध्ये झगालो हे ब्राझीलचे स्ट्रायकर खेळाडू होते. यानंतर, 1970 मध्ये, जेव्हा ब्राझीलने फायनलमध्ये इटलीला 4-1 ने पराभूत करून तिसरा विश्वचषक जिंकला तेव्हा झगालो संघाचे प्रशिक्षक होते. झगालो 1994 च्या विश्वचषक स्पर्धेत ब्राझील संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. तेव्हासुध्दा ब्राझीलने अंतिम फेरीत इटलीचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.