Auckland Classic 2024 (Coco Gauff vs Elina Svitolina) : यूएस ओपन चॅम्पियन 19 वर्षीय कोको गॉफने सलग दुसऱ्या वर्षी ऑकलंड क्लासिक स्पर्धा जिंकली. कोको गॉफ हिने युक्रेनच्या एलिना स्विटोलिना हिचा अंतिम फेरीत तीन सेटच्या लढतीत 6-7 (4), 6-3, 6-3 असा पराभव केला. कोकोने स्पर्धेत प्रथमच एक सेट गमावला. कोकोने तिच्या कारकिर्दीत स्पर्धेचे विजेतेपद राखण्याची ही पहिलीच वेळ आहे.
🔙2️⃣🔙@CocoGauff holds off a spirited effort from Elina Svitolina 6-7(4), 6-3, 6-3 to claim a second straight Auckland title 🏆🏆#ASBClassic pic.twitter.com/3U8NloqnMQ
— wta (@WTA) January 7, 2024
अंतिम फेरी पर्यतच्या प्रवासात केवळ 15 गेम गमावलेल्या कोकोला द्वितीय मानांकित स्विटोलिनाविरुद्ध दोन तास 23 मिनिटे संघर्ष करावा लागला. उपांत्य फेरीत तिचा जोडीदार एमा नवारोवर 6-3,6-1 असा विजय मिळवून 10 एसेस मारणाऱ्या आणि पहिल्या सर्व्हिसमध्ये 80 टक्के गुण जिंकणाऱ्या गॉफला अंतिम फेरीत केवळ तीन एसेस मारता आले आणि केवळ 65 टक्के गुण हे पहिल्या सर्विसवर जिंकता आले. तिने सात दुहेरी चुका (Double fault) ही केल्या.
स्विटोलीनाचे पुनरागमन प्रेरणादायी : कोको
कोकोने स्विटोलिनाविरुद्धच्या विजयानंतर सांगितले की, आई झाल्यानंतर इतक्या लवकर उच्च स्तरावर पुनरागमन करणे हे प्रेरणादायी होते.
#BrisbaneTennis2024 : राफेल नदालला पुन्हा दुखापत, ‘या’ स्पर्धेतूनही घेतली माघार…
दरम्यान, कोको ही जर्मनीच्या जूलिया गोरजेस (2018, 19) नंतर येथे सलग चॅम्पियन बनणारी पहिली खेळाडू आहे. तसेच पॅटी फेंडिक (1988, 89) नंतर असे करणारी ती पहिली अमेरिकन खेळाडू देखील ठरली.