मुंबई – मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या वाहनाचे मालक मनसूख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. या घटना ताज्या अतानाच पुन्हा एकदा सचिन वाझे चर्चेत आले आहेत.
Now BJP connection emerges – the Mercedes car allegedly used by Mansukh Hiren on 17th February is seen in a photograph of BJP office bearer of Thane.
Would @BJP4Maharashtra leaders give explanation? pic.twitter.com/w64FAyfDpi— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
या प्रकरणात आता राष्ट्रीत तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला असून मुंबई पोलिसांच्या विभागातील अधिकाऱ्यांची त्यांनी चौकशी केली. या स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजप नेत्याचे फोटो शेअर केले आहे.
काय आहे सचिन सावंत यांचे ट्विट
’17 ऑक्टोबर 2020 रोजी देवेन शेळके यांची ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली. मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांची खुलासा करावा असं म्हणत त्यांनी मर्सिडीज गाडीचा फोटो ही शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘एनआयए’च्या पथकाने जप्त केलेल्या मर्सिडीज गाडी सोबत देवेन शेळके आहे. सध्या सोशलवर या फोटोंमुळे या प्रकणात भाजप कनेक्शन असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागले आहे.