सुलतानपूरमधून मनेका गांधी पिछाडीवर

नवी दिल्ली – देशभरामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आज मतदान मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघामधून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघांमधील मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्या पार पडल्या असून सध्या येथून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार चंद्रभद्र सिंह हे 48895 मतांसह आघाडीवर असून त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या उमेदवार मनेका गांधी या 43659 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून या वेळी भाजपतर्फे मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली असून सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून आत्तापर्यंत एकही महिला खासदार निवडून आली नसल्याने भाजपच्या मनेका गांधी सुलतानपूर लोकसभा मतदारसंघाचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.