बीसीसीआयची निवडणूक 22 ऑक्‍टोबरला – सीओए

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बहुप्रतीक्षित निवडणूक 22 ऑक्‍टोबरला होणार असल्याचे प्रशासकांच्या समितीने (सीओए) मंगळवारी जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2017 मध्ये लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी सीओएची नियुक्ती केली होती. सीओएने न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेले न्यायमित्र पी.एस. नरसिम्हा यांच्या सल्ल्यानंतर निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली.

सर्वोच्च न्यायालयाने नरसिम्हा यांची विविध राज्यांच्या संघटनांसोबत मध्यस्थी करण्यासाठी मार्चमध्ये नियुक्ती केली होती. या बैठकीत सीओए प्रमुख विनोद राय यांच्यासह दोन अन्य सीओए डायना एडुल्जी व रवी थोगडे यांचा समावेश होता. बैठकीमध्ये राज्य संघटनांची निवडणूक 14 सप्टेंबरपर्यंत आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात बोलताना राय यांनी सांगितले की, 30 राज्य संघटना लोढा समितीच्या सूचनांचे पालन करीत आहेत, तर उर्वरित राज्य संघटना त्यानुसार आपल्या घटनेमध्ये बदल करीत आहेत. मला निवडणुकीची तारीख जाहीर करताना आनंद होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.