अभिनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. वयाच्या ५१ व्या वर्षीही स्वत:ला फिट ठेवणारी ही अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओंच्या माध्यमातून फिटनेसच्या टिप्स शेअर करताना दिसत आहे.
अलीकडेच, मंदिराने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिने फिट राहण्यासाठीच्या काही टिप्स सांगितल्या आहे.
आरोग्याची काळजी कशी घायची हेही तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त कसे ठेवावे? यासाठी तिने काही खास टिप्स व्हिडिओच्या माध्यमांतून सांगितल्या आहे. आता या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. चेहरा पाहून काही यूजर्सना वाटले की मंदिराने ओठांची शस्त्रक्रिया (सर्जरी) केली आहे.
मंदिरा बेदी यांना ओठांच्या शस्त्रक्रियेवरून सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. यावर मंदिराने ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ट्रोलर्सना फटकारताना मंदिराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती प्रत्येक कोनातून कॅमेरासमोर तिचा चेहरा दाखवत आहे.
तसेच, तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आता मी सर्व कोनातून कॅमेऱ्यासमोर पोझ दिली आहे. आणि हो अजून एक गोष्ट, हे फिल्टर आहे फिलर नाही.’ मंदिराची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टवर त्याचे अनेक चाहते त्याला खूप सपोर्ट करत आहेत.