MVA Lok Sabha Election 2024| महाविकास आघाडीत लोकसभा निवडणूकीबाबत काही जागांबाबत रस्सीखेच सुरू होती. अखेर हा जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी महाविकास आघाडीची जागावाटप जाहीर केली. शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे.
त्यानुसार आता महाविकास आघाडीचा 21-17-10 असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित आहेत. मागील काही दिवसांपासून सांगलीच्या जागाबाबत काँग्रेस आणि शिवसेना गटात वाद सुरू होता. अखेर सांगलीची जागा शिवसेना अर्थात ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वात अधिक जागा ह्या शिवसेनेला मिळाल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी कोणाला कुठली जागा मिळाली ते पाहुयात…
शिवसेनेला 21 जागा MVA Lok Sabha Election 2024|
मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य, मावळ, सांगली, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, यवतमाळ, वाशीम आणि हिंगोली या 21 जागांवर शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
काँग्रेसला 17 जागा
नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर, नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, मुंबई उत्तर, कोल्हापूर, रामटेक आणि सोलापूर या 17 जागांवर काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
राष्ट्रवादी 10 जागा MVA Lok Sabha Election 2024|
वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड, बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर या 10 जागांवर काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
हेही वाचा:
प्रमोद कृष्णम यांचा खोचक सल्ला,’राहुल-प्रियांका गांधी यांनी पाकिस्तानमधून निवडणूक लढवावी’