Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागावाटपावरून खटके उडत असल्याचे दिसत होते. काही जागांवर एकापेक्षा अधिक पक्षांनी दावा केल्याने महाविकास आघाडीतील तिढा सुटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र माहाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत जागावाटपाचा वाद अखेर सोडवला आहे. याबाबत महाविकास आघाडीतर्फे एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर केले. आज जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपामध्ये भिवंडी, सांगली या विवादित जागांचा तिढा सोडवण्यात तिन्ही पक्षांना यश आले असून शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या 17 जागा पुढील प्रमाणे नंदुरबार – गोवाल पाडवी धुळे – काँग्रेस – उमेदवार घोषणा नाही अकोला – अभय पाटील अमरावती – बळवंत वानखेडे नागपूर – विकास ठाकरे भंडारा गोंदिया – डॉ. प्रशांत पडोळे गडचिरोली चिमूर -डॉ. नामदेव किरसान चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर नांदेड – वसंतराव बळवंतराव चव्हाण जालना – काँग्रेस- उमेदवार घोषणा नाही मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस- उमेदवार घोषणा नाही पुणे – रविंद्र धंगेकर लातूर- शिवाजीराव काळगे सोलापूर – प्रणिती शिंदे कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती रामटेक – श्याम कुमार बर्वे मुंबई उत्तर – काँग्रेस- उमेदवार घोषणा नाही हे वाचलं का ? प्रमोद कृष्णम यांचा खोचक सल्ला,’राहुल-प्रियांका गांधी यांनी पाकिस्तानमधून निवडणूक लढवावी’