भोपाळ – महिलेचा वेश घालून ब्युटीपार्लरमध्ये जाऊन मालकिणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र तिच्या आरड्या ओरड्याने घाबरून त्याने पोबारा ठोकला. हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी तीने पोलिसांत फिर्याद दाखल केली. ( Man enters beauty parlour in woman’s attire, molests owner )
या महिलेने रविवारी पार्लर उघडल्यानंतर ग्राहक गेल्यानंतर कर्मचारी परतले. त्यानंतर त्या टीव्ही पहात होत्या. दुपारी तीनच्या सुमारास एक महिला आली. तीने कटींग करण्यास सांगितले. तिचा वेश महिलेचा होता. मात्र तिचा आवाज पुरूषाचा होता. त्यामुळे मी केस पाहिले. त्यावेळ ते पुरूषाचे असल्याचे आढळून आले, असे तीने फिर्यादित म्हटले आहे.
मात्र पार्लरमधून मी त्याला निघून जाण्यास सांगितले. पण त्याने माझा हात पकडून विनयभंग केला. त्याने माझे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला मात्र मी त्याच्या तावडीतून कशीबशी सटकले आणि सलूनच्या बाहेर पळून गेले त्यानंतर तो माणूसही पळून गेल्याचे तीने सांगितले. ( Man enters beauty parlour in woman’s attire, molests owner )
तो मनुष्य आल्याचे फुटेज देऊनही पोलिसांणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही.पोलिसांनी स्थानिक नेत्यांच्या दबावानंतर गुन्हा दाखल केला. पण त्यात केवळ विनयभंगाचे कलम लावले. त्यात बेकायदा खासगी क्षेत्रात घुसणे आणि इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणे या कलमांचा समावेश केला नाही.