नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिले होते. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे निमंत्रण स्वीकारले असून ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
ब्रिटनने ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी 7 परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. यावर्षी ब्रिटनमध्ये जी 7 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा केली.\
बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल. ब्रेक्झिटनंतर पहिल्यांदाच ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौर्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण त्यांचे निमंत्रण स्वीकारले असल्याचे म्हटले आहे तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी 7 परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले आहे.
दरम्यान, ब्रिटनला भारतासोबत आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा असल्याची माहिती ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.