प.बंगाल – भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या बाबत चा निर्णय पश्चिम बंगालच्या ममता दीदी सरकार कडून घेण्यात आला आहे. सौरभ यांची सुरक्षा ‘वाय’ श्रेणीवरून ‘झेड’ श्रेणीत करण्यात आली आहे.
मात्र, या सुरक्षेबाबत गांगुलीच्या बाजूने कोणतीही मागणी करण्यात आलेली नव्हती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःच हा निर्णय घेतला असून आता गांगुली यांच्या सुरक्षेत 8 ते 10 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. यापूर्वी त्यांचा सुरक्षेसाठी तीन पोलीस तैनात करण्यात आले होते.
‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष सौरव गांगुली –
सौरव गांगुली हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आहेत त्यांनी 2019 मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून रॉजर बिन्नी हे नवीन बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, सौरव गांगुली सध्या आयपीएल 2023 हंगामाध्ये व्यस्त असून ते दिल्ली संघासाठी संचालकाची भूमिका बजावत आहे.