डोर्लेवाडी वार्ताहर : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे प्रमुख रंजनकुमार तावरे यांनी पतसंस्थेचे सचिव नंदकुमार खैरे यांच्या संगनमताने 51 लाख 30 हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा तालुका पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.
याप्रकरणी माळेगाव कारखान्याचे संचालक सुरेश तुकाराम खलाटे यांनी तावरे व खैरे यांच्याविरोधात शनिवारी रात्री उशिरा पोलिसात फिर्याद दिली. 2011साली पतसंस्थेचे अध्यक्ष रंजन तावरे व सचिव नंदकुमार खैरे यांनी संगनमत करून माझ्यासह रामदास आटोळे, राजेंद्र बुरुंगले आम्हा तिघांच्या कोऱ्या कर्ज मागणी प्रकरणावर व धनादेशावर सह्या घेतल्या व आमच्या नावे प्रत्येकी 17 लाख 10 हजार रुपये असे एकूण 51 लाख 30 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दाखवले तसेच सदर रक्कम बेरर चेक द्वारे आमच्या परस्पर काढून घेतली अशी तक्रार सुरेश खराटे यांनी फिर्यादीत नमूद केली आहे..
याबाबत फिर्याद व सहाय्यक निबंधकाच्या चौकशी अहवालाच्या आधारे पोलिसांनी शरद संस्थेचे अध्यक्ष रंजन तावरे व सचिव नंदकुमार खैरे च्या विरुद्ध फसवणूक करणे बनावट कागदपत्रे तयार करणे रकमेचा अपहार करणे विश्वासघात करणे तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहेत दरम्यान या प्रकरणी फिर्यादी व व संशयित आरोपी तावरे हे एकमेकांचे वीस वर्षापासून चे खंदे समर्थक होते परंतु मार्च 2019 मध्ये शहरात संस्थेतून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच खलाटे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कायदेशीर मार्गाचा पाठपुरावा केला होता.