बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची चौफेर प्रगती

पुण्यातील प्रभात राडे शाखेचा 12वा वर्धपनदिवस उत्साहात साजरा

बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीची प्रभात रोड शाखा आपला बारावा वर्धापन दिवस साजरा करीत आहे. बुलडाणा अर्बनच्या महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, तेलंगणा, सीमांध्र, अंदमान व निकोबार ठिकाणी 453 शाखा आहेत. एकूण ठेवी 7,872 कोटी आणि एकूण कर्ज 5,743 कोटी रुपयांचे आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना धान्य साठविण्यासाठी मदत व्हावी याकरिता बुलडाणा अर्बनने 355 गोडावून उभी केलेली आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शीतगृहाची उभारणी केली आहे. त्यामुळे अन्नधान्याची नासाडी होत नाही आणि शेतकऱ्यांना त्यांचा मालाला योग्य दर मिळण्यास मदत होते. राधेश्‍याम चांडक यांनी 1986 मध्ये बुलडाणा अर्बनची स्थापना केली. त्यानंतर बुलडाणा अर्बनने आपला कार्यविस्तार अनेक राज्यात केला आहे. विशेष म्हणजे बुलडाणा अर्बन कर्ज देताना कसल्याही दबावाला बळी पडत नाही. त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्याची व्यवस्थित चौकशी करून कर्ज दिले जाते.

त्यामुळे बुलडाणा अर्बनचे ढोबळ व निव्वळ एनपीए 3 टक्‍क्‍यापेक्षा कमी आहे. ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्यावर बुलडाणा अर्बनचा भर असतो. त्याचाच भाग म्हणून त्वरित कर्ज योजना, युटिलिटी पेमेंट, एसएमएस बॅंकिंग, इलेक्‍ट्रॉनिक व्हॅलेट, इझी पे कार्ड इत्यादी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना तीर्थयात्रेसाठी जाताना मदत व्हावी याकरिता तिरुपती, शिर्डी, कोल्हापूर, माहूर इत्यादी ठिकाणी भक्त निवास उपलब्ध केले आहे. लोकांना तिकीटाची व्यवस्था करू राहण्याची माफक दरात व्यवस्था केली जाते. याशिवाय बुलडाणा अर्बननेआणखी एक घेतलेला महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे सेंद्रिय उत्पादनाची उपलब्धता. पुण्यातील अष्टांग आयूर्वेद ईमारत, टिळक रोड पुर्ण जैवीक स्टोअर उभारण्यात आले आहे.

बुलडाणा अर्बन अनेक राज्यात धुमधडाक्‍यात चालू आहे यामुळे आनंदित झालेले बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी सांगितले की, राधेशाम चांडक यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सहकाराच्या माध्यमातून मदत करण्यात यशस्वी झालेलो आहोत. बुलडाणा अर्बनने महिला सबलीकरणासाठी मायक्रोफायनान्स योजना सुरू केलेली आहे. याकरिता बुलडाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाची वेगळी संस्था उभा करण्यात आली असून या संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी स्वप्नील वानखेडे आहेत.
महाराष्ट्रभर ही संस्था महिलांना कौशल्य विकास, मायक्रोफायनान्स इत्यादी क्षेत्रांमध्ये मोलाची मदत करीत आहे. पर्यावरण रक्षणासाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी छात्र निकेतन, पशुधन काळजी, रस्ते उभारणी या क्षेत्रातही बुलडाणा अर्बनचा पुढाकार असतो. पश्‍चिम महाराष्ट्रातही बुलडाणा अर्बनने आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे. बुलडाणा अर्बनची पुण्यातील प्रभात रोड शाखा 365 दिवस कार्यरत असते. ऑनलाइन पेमेंट, रोबोटिक्‍स लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आली आह. यामुळे बुलडाणा अर्बणला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. व्यवसायाच्या जबाबदारीबरोबरच बुलढाणा अर्बनने महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा, शुद्ध जल योजना, पूरग्रस्तांना मदत इत्यादी क्षेत्रात मोठे काम केले आहे असे शिरीष देशपांडे सांगतात.

बुलडाणा अर्बनच्या पुण्यामध्ये प्रभात रोड, पौड रोड,औंध, मार्केट यार्ड, शनिपार या ठिकाणी शाखा आहेत पिंपरी चिंचवड विभागांमध्ये चिंचवड, भोसरी, आळंदी, चाकण, शिक्रापूर, काळेवाडी, नवी सांगवी, चिखली येथे शाखा आहेत,
साताऱ्यामध्ये सातारा, फलटण, बारामती, लोणंद, कोरेगाव, मसवड, मसूर, वाई, कराड दहिवडी, सातारा -महिला, उंब्रज येथे शाखा आहेत. कोल्हापूर विभागामध्ये लक्ष्मीपुरी, कुरुंदवाड, महालक्ष्मी मंदिर, गडहिंग्लज, कसबा बावडा, आजरा इचलकरंजी, जयसिंगपूर, चंदगड, गारगोटी येथे शाखा आहेत. बुलडाणा अर्बनच्या महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, तेलंगणा, सीमांध्र, अंदमान व निकोबार येथे शाखा आहेत. मुख्य कार्यालय बुलडाणा येथे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here