eknath shinde । लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. महायुतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघाचा सस्पेन्स वाढला आहे. कारण अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी नाशिक येथून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काही दिवसापूर्वीही नाशिक लोकसभा मतदार संघ चर्चेत आला होता कारण, मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून शिंदे गटाच्या नेते, खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अशात नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु असतांना हेमंत गोडसे हे आपल्या समर्थकांसह २४ मार्चला मुंबईत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. गोडसेंच्या या शक्तिप्रदर्शनाने जी शंका गेल्या काही दिवसांपासून बोलून दाखवली जात होती, ती खरी ठरताना दिसत आहे. गोडसे यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे बोलले जात असून, गोडसेंबरोबर शिवसेनेच्या 5 ते 6 खासदारांना डच्चू दिला जाणार, असे सांगितले जात आहे.
मिळलेल्या माहितीनुसार महायुतीकडून लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व्हे करण्यात आले होते. यात शिवसेनेच्या पाच ते सहा खासदारांच्या मतदारसंघातील सर्व्हे चांगला नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे या खासदारांचे तिकीट कट होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.या सर्वेनुसार भाजपकडूनही शिंदे गटातील हे खासदार बदलण्याची सूचनाही भाजपकडून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यादृष्टीने आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
सर्वेनुसार नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे तर यवतमाळमधून भावना गवळी आणि हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा तर कृपाल तुमाने रामटेक लोकसभा, गजानन कीर्तिकर, मुंबई उत्तर पश्चिम, संजय मंडलिक, कोल्हापूर या सर्व शिंदेंच्या शिवसेनेच्या ५ ते ६ खासदारांविरोधात मतदारसंघात वातावरण असून, त्यांना बदलण्याची सूचनाही देण्यात आल्याची चर्चा आहे.
हे वाचल का ? हत्ती वाढवणार भाजपचे टेन्शन ? मायावतींच्या खेळीमुळे बसपावरील भाजपची ‘B Team’ असल्याचा टॅग मिटणार?