Unmesh Patil join Thackeray Group। जळगाव भाजपला आज मोठे खिंडार पडले आहे. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. भाजपकडून लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज होते. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे.
खासदार उन्मेष पाटील यांच्या हाती शिवबंधन Unmesh Patil join Thackeray Group।
उन्मेष पाटील यांनी कालच मुंबईत संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाला होता. त्यानंतर त्यांचा आज शिवसेना ठाकरे गटात अधिकृत पक्षप्रवेश झाला आहे. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याचे सांगण्यात येतंय.
पक्षप्रवेशावर उन्मेश पाटील काय म्हणाले? Unmesh Patil join Thackeray Group।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपला माझ्या कामाची किंमत नाही, एका भावाने दगा दिला असला तरी, दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, हा मला विश्वास असल्याने आपण शिवसेना ठाकरे गटात सामील होत आहे,” असे उन्मेष पाटील यांनी म्हटलं.
आधी राजीनामा, मग प्रवेश
दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उन्मेष पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा पत्र दिलं आहे. मेलच्या माध्यमातून उन्मेष पाटील यांनी त्यांचा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने पत्र लिहून उन्मेष पाटील यांनी राजीनामा दिला. मी माझ्या जळगाव लोकसभा सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत असून तो स्वीकार करावा, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले. राजीनामा दिल्यानंतरच उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात आज प्रवेश केला.