Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांचे (Mahua Moitra)काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या फोटोवरून राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. हे फोटो एका हॉटेलमध्या आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतले असल्याचे दिसत असून त्यामध्ये महुआ मोईत्रा (Mahua Moitra)यांच्यासमवेत शशी थरूरही (Shashi Tharoor)दिसत आहेत. दरम्यान त्यांनी या फोटोंवर स्पष्टीकरण देताना भाजपाला थेट आव्हान दिले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra)यांचे एका पार्टीतले फोटो व्हायरल होत असून हे फोटो भाजपाच्या ट्रोलर्सकडूनच व्हायरल केले जात असल्याचा दावा मोईत्रा यांनी केला आहे. या फोटोंमध्ये महुआ मोईत्रा (Mahua Moitra)काँग्रेसचे राज्यसभा खासदार शशी थरूर(Shashi Tharoor) यांच्यासह दिसत आहेत. एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डिनर पार्टीमधले हे फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हे नेमकं कधी घडलं, याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. या फोटोंमध्ये काही ठिकाणी महुआ मोईत्रा (Mahua Moitra)हातात मद्याचा ग्लास घेऊन शशी थरूर (Shashi Tharoor)यांच्यासह फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. तर एका फोटोमध्ये हातातील सिगार पित असल्याची पोज मोईत्रा यांनी दिली आहे.
Whats cooking between Shashi Tharoor and Mahua Moitra?? 😉😂🍻🍸 #HaramiMahua #ShashiTharoor #MahuaMoitra pic.twitter.com/wg10lxM3EJ
— Rosy (@rose_k01) October 14, 2023
दरम्यान, या फोटोंसाठी आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना मोईत्रा (Mahua Moitra)यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “भाजपाच्या ट्रोल सेनेकडून माझे काही खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचं पाहून मी सर्वात जास्त आश्चर्यचकित झाले आहे”, असे मोईत्रा यांनी ट्विटर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Most amused to see some personal photos of me being circulated on social media by @BJP4India ‘s troll sena.
I like green dress better on me than white blouse. And why bother cropping – show rest of the folks at dinner as well.
Bengal’s women live a life. Not a lie.— Mahua Moitra (@MahuaMoitra) October 15, 2023
“मला पांढऱ्या ब्लाऊजपेक्षा हिरव्या रंगाचे कपडे जास्त आवडतात. आणि तुम्ही फोटो क्रॉप का केलात? त्या डिनरसाठी उपस्थित असणाऱ्या इतर मान्यवरांचेही फोटो दाखवा. बंगाली महिला आयु्ष्य जगतात, असत्य नाही”, असेही त्यांनी (Mahua Moitra)या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
I don’t smoke. Am severely allergic to cigarettes. I was just posing for a joke with a friend’s cigar.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) October 15, 2023
दरम्यान, आपल्याला सिगारेट्सची अॅलर्जी असल्याचे त्यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. “मी धुम्रपान करत नाही. मला सिगारेटची भयंकर अॅलर्जी आहे. मी एका सहकाऱ्याची सिगार हातात घेऊन फक्त फोटोसाठी पोज देत होते”, असे स्पष्टीकरण मोईत्रा(Mahua Moitra) यांनी त्या फोटोवर दिले आहे.