Mahua Moitra : तृणमूल काँग्रेस (TMC) च्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचे भाजपकडून आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, याच प्रकरणी आता त्यांची एथिक्स पॅनलद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी महुआ मोईत्रा यांनी माहिती देत आपण पॅनलसमोर चौकशीस हजार राहणार असल्याची माहिती दिली.
महुआ मोईत्रा यांनी आज याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपावर चोकशीसाठी पॅनेलच्या आदेशानुसार उद्या समितीसमोर हजर राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी याविषयीची माहिती ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत दिली. ट्विटमध्ये दोन पानांचे पत्र पोस्ट केले, ज्यामध्ये त्यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानीची “तपासणी” करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
Since Ethics Committee deemed it fit to release my summons to the media I think it is important I too release my letter to the Committee before my “hearing” tomorrow. pic.twitter.com/A8MwFRsImk
— Mahua Moitra (@MahuaMoitra) November 1, 2023
महुआ मोईत्रा यांनी लिहिले,”एथिक्स पॅनलला मला बजावलेले समन्स माध्यमांसमोर प्रसिद्ध करणं योग्य वाटलं आहे. त्यामुळे मला वाटत माझ्या प्रकरणाची सुनावणी होण्याअगोदर माझं पात्र प्रसिद्ध करावं” तत्पूर्वी, आचार समितीने महुआ मोइत्राची 5 नोव्हेंबरनंतर बोलावण्याची विनंती फेटाळून लावली होती आणि त्यामुळे आता त्यांना 2 नोव्हेंबरला येण्यास सांगितले त्यानुसार त्या उद्या पॅनलसमोर हजर राहणार आहेत.
दरम्यान, काल महुआ मोईत्रा यांनी सांगितले होते की, सन २०२१ पासून आचार समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यासाठी अद्याप आदर्श आचारसंहिता तयार करणे बाकी आहे. कोणत्याही संसदीय स्थायी समितीला गुन्हेगारी प्रकरणांचा अधिकार नाही. निर्दोष असल्याचा दावा करत टीएमसी नेते म्हणाले, “त्यांना फक्त मला गप्प करायचे आहे आणि मला निलंबित करायचे आहे. ते खोटे अहवालही तयार करू शकतात. पण सत्य हे आहे की ते माझे नुकसानही करू शकत नाहीत.” असे म्हटले होते.