पुणे – गुलटेकडी मार्केटयार्डातून शहरासह विविध भागात होणारा शेतमालाचा पुरवठा बंद होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महात्मा फुले मंडईतील भाजी विक्री शुक्रवारी (दि. 10) सकाळी आठपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बाजार बंद ठेवणार असल्याची माहिती विक्रेते हर्षद करंजावणे यांनी दिली.
भुसार बाजार सुरूच राहणार
गुळ-भुसार बाजार मात्र सुरूच राहणार आहे. दि पुना मर्चंटस चेंबरची बैठक झाली. या बैठकीत अन्नधान्य हा पुरवठा सुरळीपणे सुरू राहण्यासाठी भुसार बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.