नवी दिल्ली – द्वेषाच्या वादळात “सत्य आणि समरसतेची ज्योत” विझू न देणे हीच राष्ट्रपिता यांना खरी श्रद्धांजली असेल असे कॉंग्रेसने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना नमूद केले आहे.
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करणाऱ्यांना आयडिया ऑफ इंडियाची व्याख्या करण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी आम्ही ती व्याख्या करू देणार नाही असेही पक्षाने म्हटले आहे.
एक्स वरील एका पोस्टमध्ये, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे की, शहीद दिनी, आम्ही बापूंना आदरांजली अर्पण करतो, आमच्या राष्ट्राचे नैतिक आणि ‘सर्वोदय’ यावर आधारित महात्मा गांधी यांचे आदर्श नष्ट करू पाहणाऱ्यांविरुद्ध लढण्याची आपण प्रतिज्ञा केली पाहिजे.”विविधतेतील एकता’ असलेल्या भारताचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या लोकांमध्ये न्याय, समानता आणि बंधुता सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्व शक्य ते प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहनही त्यांनी केले.
‘एक्स’वर हिंदीतील एका पोस्टमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, याच दिवशी द्वेष आणि हिंसेच्या विचारसरणीने पूज्य बापूंना देशातून हिरावून घेतले होते. आणि आज त्याच विचारसरणीला त्यांची तत्वे आणि आदर्श आमच्यापासून हिरावून घ्यायचे आहेत.परंतु द्वेषाच्या या वादळात सत्य आणि सलोख्याची ज्योत विझता कामा नये,आणि हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली असेल.
महात्मा गांधींच्या हत्येच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ बिहारमधील अररिया येथील भारत जोडो न्याय यात्रा शिबिराच्या ठिकाणी सकाळी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.एक्सवर एका पोस्टमध्ये, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रार्थना सभेतील छायाचित्रे शेअर केली जिथे राहुल गांधी आणि इतर अनेक नेत्यांनी राष्ट्रपिता यांना श्रद्धांजली वाहिली.रमेश म्हणाले, “ज्या विचारसरणीने महात्माजींना त्याच्या हयातीत विरोध केला आणि त्यांना नाकारले तेच आता त्यांना वारंवार योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांच्याविरुद्धची आमची लढाई सुरूच सुरूच राहील असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “जे गोडसेचा गौरव करतात त्यांना भारताच्या कल्पनेची व्याख्या करू दिली जाऊ नये.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले की, महात्मा गांधी यांची हत्या झाली असली तरी लाखो भारतीय विशेषत: सामान्य भारतीय, त्यांचे जीवन, प्रेम, सद्भाव, बंधुता आणि शांततेच्या त्यांच्या शिकवणीची कदर करतात.आज या मूल्यांना आव्हान दिले जात आहे, परंतु, शेवटी, गांधीजींच्या मूल्यांचा विजय होईल, असे ते म्हणाले.