नवी दिल्ली – अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे माजी प्रदेश सचिव आशुतोष सिंह यांची पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात पोस्टर लावल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
सपाच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या पोस्टरमध्ये ‘राजनीती के दो पलटूराम, जनता रहें इनसे सावधान’ असा मजकुर होता. यातील एक पलटूराम नितीश कुमार तर दुसरे पलटूराम उत्तर प्रदेशातील एसबीएसपी पक्षाचे नेते ओ. पी. राजभर असे दर्शवण्यात आले होते.
नितीश यांच्या सातत्याने भूमिका बदलण्यामुळे ते सध्या राजकारणात याच नावाने परिचित आहेत. त्यामुळे त्यांचा असा उल्लेक अलिकडे सगळीकडेच केला जातो आहे. तथापि, सपाच्या प्रदेश सचिवाने केलेला हा उल्लेख मात्र त्यांच्याच पक्षाला खटकला असून त्यांनी कारवाई केली आहे.
#WATCH लखनऊ: समाजवादी पार्टी कार्यालय के बाहर बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार और SBSP प्रमुख ओम प्रकाश राजभर के खिलाफ पोस्टर लगाए गए। pic.twitter.com/IfvrmdVmIg
— ANI_HindiNews (@AHindinews) January 30, 2024
राजभर हेही भूमिका बदलण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर अखिलेश यादव कायमच लक्ष्य केले असून त्यांच्या पात्रतेबद्दलच प्रश्न उपस्थित केले आहे. असे असतानाही नितीश आणि राजभर यांच्यावरील टीका समाजवादी पक्षाला का खटकली हेही एक कोडेच आहे.