मुंबई – मध्य प्रदेशमधील जबलपूरला येत्या 26 ते 30 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या 54 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. पुण्याचा सुयश गरगटे आणि प्रियंका इंगळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
सोलापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीद्वारे या संघांची निवड करण्यात आली. बिपीन पाटील आणि महेश पालांडे यांच्याकडे यावर्षीही अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे सोपवण्याचा निर्णय महाराष्ट्र खो-खो संघटनेने घेतला आहे.
संघ – पुरुष :- सुयश गरगटे (कर्णधार), प्रतीक वाईकर, ऋषिकेश मुर्चावडे, मिलिंद कुरपे, सागर लेंगरे, अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, हर्षद हातणकर, अरुण गुणकी, सूरज लांडे, गजानन शेगाळ, राहुल सावंत, लक्ष्मण गवस, अभिषेक पवार, श्रेयस राऊळ.
महिला – प्रियंका इंगळे (कर्णधार), दीपाली राठोड, श्वेता वाघ, स्नेहल जाधव, रुपाली बडे, रेश्मा राठोड, पूजा फरगडे, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, जान्हवी पेठे, अपेक्षा सुतार, आरती कांबळे, अंकिता लोहार, पायल पवार, संध्या सुरवसे.