पणजी – गोव्यातील आणखी एका आमदाराने कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे गोव्यातील कॉंग्रेस आमदारांची संख्या केवळ 2 इतकीच उरली आहे. वास्तविक या विधानसभेत सुरूवातीच्या काळात कॉंग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता.
आज राजीनामा देणाऱ्या आमदाराचे नाव अलेक्सिओ रेगिनाल्डो लॉरेन्को असे आहे. ते प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पहात होते. विशेष म्हणजे कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात लॉरेन्को यांच्या नावाचाही समावेश होता.
ते आता ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेस पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन 2017 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या.