आंबेगाव-शिरूर मतदारसंघात शिरूरमधील 42 गावांत संधी
रांजणगाव गणपती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर-आंबेगाव विधानसभा मदारसंघातील पदाधिकार्यांच्या निवडी गुरूवारी पुणे येथे जाहीर करण्यात आल्या.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यामध्ये मतदारसंघातील शिरूरमधील 42 गावांतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली.
या निवडीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामू घोडे, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे आदींनी स्वागत केले.
शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष : बन्सीशेठ घोडे, ओबीसी सेल अध्यक्ष : नाना फुलसुंदर, कार्याध्यक्ष (युवक) : परशुराम डांगे उत्तम व्यवहारे, उपाध्यक्ष : गोरखनाना ढोकले, पुणे जिल्हा(ग्रामीण) सरचिटणीस : शहाजीराव डफळ.