आळंदी – बालाजी युनिव्हर्सिटी पुणे संचलित बालाजी कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स पुणे यांचे वतीने आयोजित ०५ डिसेंबर २०२३ ते ०६ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झालेल्या अंतर जिल्हा महाविद्यालयीन खो – खो स्पर्धेमध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
वयोगट १७ मध्ये मुले प्रथम क्रमांक मिळवला. विजयी मुलांचे ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख दहा हजार रूपये देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वयोगट १९ मध्ये मुले व्दितीय क्रमांक मिळवून ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख सात हजार रूपये देऊन सन्मान करण्यात आला.
या सर्व विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा विभाग प्रमुख श्रीरंग पवार, क्रीडा शिक्षक राजश्री भुजबळ, प्रकाश पवार, येडबा कांबळे यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य दीपक मुंगसे, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.