MAHARASHTRA SHREE 2024 (Pune) : – शहाजीराजे क्रीडा संकुल- अंधेरी, मुंबई येथे माननीय सिद्धेश रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा उपविजेते पदाचा मान मिळवला.
स्पर्धेतील पुणे जिल्हा संघाच्या सर्व यशस्वी खेळाडूंचे पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे रांजेंद्र नगरे, मनिष पोकळे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे या संस्थेच्या दिलीप धुमाळ व मयूर मेहेर यांनी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
५५ किलो – प्रथम क्रमांक – रोशन घारे. ६० किलो – प्रथम क्रमांक – बाळू काटे. सहावा क्रमांक – सचिन सावंत.
६५ किलो – प्रथम क्रमांक – नरेंद्र वाल्हेकर. ७५ किलो – तृतीय क्रमांक – आकाश दडमंल.
८० किलो – चतुर्थ क्रमांक – शैलेंद्र यादव. सहावा क्रमांक – अक्षय शिर्के.
८५ किलो – द्वितीय क्रमांक – संदेश नलावडे. पाचवा क्रमांक – उदय ननावरे.
९० किलो – द्वितीय क्रमांक – सोहम चाकणकर. पाचवा क्रमांक – मल्लेश धनगर.
फिजिक्स – १६५ सेंमी वरील – तृतीय क्रमांक – मंगेश बेत. चतुर्थ क्रमांक – रोहण गोगावले. वुमन बॉडी बिल्डिंग – पाचवा क्रमांक – सुप्रिया इल्हे.