पुणे – देशातील सर्वच घटकांना करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बसू लागला असला, तरी सर्वाधिक दयनीय अवस्था झाली आहे, ती निराधार वृध्द इसामांची. या वर्गात मोडणाऱ्या आणि हातावर पोट असलेल्या या लोकांवर करोनामुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे.
अशातच सासवड शहरातील सोपान काका मंदिर व इतरत्र असणाऱ्या निराधार वृद्ध इसमाना लॉकडाऊन काळात दिवसातून दोन वेळा पूर्ण जेवण देण्याचे काम सासवड पोलिसांनी सुरू केलं आहे. या कसोटीच्या काळात पोलीस बांधवांनी जपलेला मानवतेचा हा दृष्टिकोन कौतुक करण्यासारखाच आहे.
https://twitter.com/puneruralpolice/status/1243481407583735810?s=19
खाकी वर्दीतील पोलीस म्हटला की जनतेच्या मनात वेगळीच भावना व्यक्त केली जात असते. मात्र त्यांच्यातही माणुसकीचा धर्म असतो, याची प्रचिती यामुळे आली आहे. इतरवेळी ज्या वर्दीचा धाक वाटतो. त्याच वर्दीतल्या माणसांनी या निराधार वृध्दांची भागवलेली ही भूक माणुसकीचे दर्शन घडवते.