महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धा : केडन्स व हेमंत पाटील ‘अ’ यांच्यात अंतिम लढत

पुणे  -हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अक्षय वाईकर(3-21)याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने युनायटेड स्पोर्टस क्‍लब संघाचा 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना क्‍लब येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश वरघंटी(3-8), अक्षय वाईकर (3-21), पारस रत्नपारखी(2-14), सईद इझान (2-17)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे युनायटेड स्पोर्टस क्‍लब संघाचा डाव 20.2षटकात सर्वबाद 67 धावावर संपुष्टात आला.

यात रोहित कारंजकर 21, अजित गव्हाणे 16, शुभम पाटील 10 यांनी धावा काढून थोडासा प्रतिकार केला. केडन्स क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान 9.1षटकात 69धावा करून पूर्ण केले. यात हर्षद खडीवालेने 28 चेंडूत नाबाद 37 धावा व जय पांडेने 27 चेंडूत नाबाद 27धावा काढून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी अक्षय वाईकर ठरला.

संक्षिप्त धावफलक

उपांत्य फेरी : युनायटेड स्पोर्टस क्‍लब: 20.2 षटकांत सर्वबाद 67 (रोहित कारंजकर 21, अजित गव्हाणे 16, शुभम पाटील 10, सिद्धेश वरघंटी 3-8, अक्षय वाईकर 3-21, पारस रत्नपारखी 2-14, सईद इझान 2-17) पराभूत वि. केडन्स क्रिकेट अकादमी: 9.1 षटकांत बिनबाद 69 (हर्षद खडीवाले नाबाद 37, जय पांडे नाबाद 27); सामनावीर-अक्षय वाईकर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.