भवानीनगर, (वार्ताहर) – महागणपती व्यापार पेठ तरुण मंडळ व श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरच्या वतीने गणेश जयंती व महागणपती मंदिराचा 27वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री गणेश जयंतीनिमित्त महागणपती व्यापार पेठमधील श्री गणेश मंदिरामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व त्यांच्या पत्नी अमृता काटे यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली.
यावेळी कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, नानासो काटे, दिलीप भोईटे, दिगंबर मदने, भागवत देवकर, संतोष चव्हाण, सतीश काटे, अमोल भोईटे, कामगार नेते युवराज रणवरे त्याचबरोबर श्री छत्रपती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रमेश मचाले, श्री छत्रपती मुलींच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण गिरीगोसावी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.