श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- आम्ही ऊस दुसर्या कारखान्याला दिला, असा रिपोर्ट वरिष्ठांना का केला, असे म्हणत चार जणांनी अशोक कारखान्याचे स्लिप मास्तर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना अशोकनगर येथे घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारखान्याचे स्लिप मास्तर शरद हौशिराम देवकर हे घरी असताना जगन्नाथ खाडे, सुमित खाडे, रोहीत खाडे, पंकज गाडे यांनी देवकर यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ सुरू केली. त्यावर शरद देवकर व त्यांच्या आईने त्यांना शिवीगाळ का करता, याबाबत विचारणा केली. त्यावर वरील चार जणांनी आम्ही ऊस दुसर्या कारखान्याला दिला, असा रिपोर्ट वरिष्ठांना का केला, असे म्हणत शरद देवकर यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
तसेच त्यांच्या आईलाही ढकलून दिले. त्यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी शरद देवकर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरुन जगन्नाथ खाडे, सुमित खाडे, रोहीत खाडे, पंकज गाडे यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.