पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पुणे रेल्वे स्थानकातील यार्डात रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. यात डबा पूर्णपणे खाक झाला. सुदैवाने घटनेत कोणी जखमी झाले नाही.
पुणे रेल्वे स्थानकातील यार्डात ट्रेन थांबविण्यात येतात. यार्डात तेथे त्यांनी स्वच्छता केली जाते. मध्यरात्री दोनच्या सुमारास जंक्शन यार्डात थांबलेल्या एका डब्यात आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. चार बंब आणि टंँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. रेल्वे यार्डात थांबली असल्याने प्रवासी नव्हते. आगीत एक डबा पूर्णपण जळाला असून, दोन डब्यांना आगीची झळ पोहोचली आहे. आगीमागचे कारण समजू शकले नाही.