नगर – शहराच्या स्थापनेस 530 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवरे अग्नेय गुरुकुल तर्फे अहमदनगर नॉट आऊट 530 ही ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
अरणगाव येथील अग्नेय गुरुकुल ही सीबीएसई शाळा आहे. या शाळेमार्फत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. नगर शहर हे ऐतिहासिक शहर असून अनेक राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक तसेच शैक्षणिक चळवळीचे साक्षीदार आहे.
या शहराची सर्वांना माहिती व्हावी तसेच शहराबद्दल आत्मीयता वाढून त्याच्या विकासासाठी जागृती व्हावी या साठी अग्नेय गुरुकुल ने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेची संकल्पना प्रा. शैलजा लोटके, सुनील लोटके यांचे असून तांत्रिक सहाय्य सुशांत लगड, तृप्ती गांधी, भक्ती उंडे हे परिश्रम घेत आहेत. ही स्पर्धा 27 मे रोजी संध्याकाळी 8 वाजता ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार असून सर्वासाठी खुली आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार असून,इच्छुकांनी नावनोंदणी करिता (मो.9403698040) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.