WTT Feeder Cappadocia 2024 : भारताच्या आकाश पाल-पोयमंती बैस्या जोडीनं पटकावले मिश्र दुहेरीचे विजेतेपद…

WTT Feeder Cappadocia 2024 : भारतीय टेबल टेनिसपटू आकाश पाल आणि पोयमंती बैस्या यांनी शुक्रवारी तुर्कीतली नेव्हसेहिर येथे डब्ल्यूटीटी फीडर कॅपाडोसिया 2024 मध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत देशबांधव अनिर्बन घोष आणि स्वस्तिका घोष यांचा 3-2 (12-10, 3-11, 8-11, 11-8, 12-10) असा रोमांचक सामन्यात पराभव केला. याआधी उपांत्य फेरीत पाल आणि बैस्या यांनी युक्रेनच्या आंद्रे ग्रेबेनियुक आणि दिमित्रेन्को यांचा 3-0 (11-8, 11-4, 11-6) असा पराभव केला होता.
🏆 𝗪𝗧𝗧 𝗙𝗲𝗲𝗱𝗲𝗿 𝗕𝗲𝗶𝗿𝘂𝘁 𝗜𝗜 ✅
🏆 𝗪𝗧𝗧 𝗙𝗲𝗲𝗱𝗲𝗿 𝗖𝗮𝗽𝗽𝗮𝗱𝗼𝗰𝗶𝗮 ✅Second 🏆 in 2024 for Akash & Poymantee! ⚡️⚡️#UltimateTableTennis #UTT #TableTennis pic.twitter.com/Y0HUZ4hvbr
— Ultimate Table Tennis (@UltTableTennis) May 17, 2024
पाल आणि बैस्याचे हे दुसरे WTT विजेतेपद आहे. भारतीय टेबल टेनिस जोडीने मार्चमध्ये बेरूतमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावून त्यांच्या वरिष्ठ देशबांधव साथियान गणानाशेखरन आणि मनिका बत्रा यांना पराभवाचा धक्का दिला होता.
Elorda Cup 2024 (Boxing) : निखत-मीनाक्षीचे सुवर्णयश; भारताने 12 पदकांसह केला मोहिमेचा शेवट…
दुसरीकडे याच स्पर्धेत महिला दुहेरीत, पोयमंती बैस्या आणि क्रित्विका रॉय यांना अंतिम फेरीत जपानच्या होनोका हाशिमोटो आणि हितोमी सातो यांच्याविरुद्ध 3-0 (11-1, 11-3, 11-8) ने पराभव पत्करावा लागला.

