IPL 2024 (RR vs KKR Match 70) : आयपीएल 2024 चा शेवटचा लीग सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ रविवारी संध्याकाळी 7.30 गुवाहाटीमध्ये एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. केकेआर सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले असून आता एक रंजक सामना पाहायला मिळणार आहे.
RR vs KKR Live Score : टॉसपूर्वी पावसाला सुरूवात…
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी गुवाहाटीमध्ये पाऊस सुरू झाला आहे. मैदान पुर्णपणे कव्हर्सने झाकण्यात आले आहे. अशा स्थितीत टॉसला उशीर होणार आहे.
🚨 Update from Guwahati 🚨
Toss in the #RRvKKR clash has been delayed due to rain 🌧️
Stay tuned for further updates.
Follow the Match ▶️ https://t.co/Hid26cHubo#TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
आयपीएल 2024 मध्ये राजस्थानने चमकदार कामगिरी केली आहे. संघाने 13 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत. त्याचबरोबर 5 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थानचे 16 गुण आहेत. केकेआरने या मोसमात 13 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यांनी 9 जिंकले आहेत आणि 3 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचे 19 गुण आहेत.
दरम्यान, राजस्थान विरूध्द कोलकाता या सामन्याच्या आधी (IPL 2024 , Match 69) सनरायझर्स हैदराबाद विरूध्द पंजाब किंग्जचा सामना झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 5 गडी गमावून 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्सने 19.1 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले व विजय मिळवला.