चंदीगड Lok Sabha Election 2024 – आम आदमी पक्ष (AAP) आणि कॉंग्रेस (Congress) यांच्यात झालेल्या युतीमुळे आम्ही हरियाणात सर्व दहाही लोकसभा मतदार संघात विजयी मिळवून भाजपला पराभूत करू, असा विश्वास आम आदमी पार्टीचे हरियाणा प्रमुख सुशील गुप्ता (Aam Aadmi Party Haryana chief Sushil Gupta) यांनी रविवारी विश्वास व्यक्त केला आहे. लोकांना केंद्रात आणि हरियाणामध्ये बदल हवा आहे, असा दावा त्यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीत आम आदमी पक्षही कॉंग्रेस समवेत आहे. या दोन्ही पक्षांत पाच राज्यांत आघाडी झाली आहे. आम आदमी पक्षाला कुरूक्षेत्र येथील जागा मिळाली असून तेथून पक्षाने गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. ते म्हणाले की, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जात आहेत.