पाटणा (बिहार) – नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राजकारणात अनेकवेळा कोलांट उड्या मारल्या. आता ते भाजपमध्ये गेले असून आता आपण शेवटपर्यंत येथेच राहणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
निदान आता तरी आपल्या या शब्दांवर ठाम राहा, अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी आज नितीशकुमार यांच्यावर टोला लगावला. नितीशकुमार यांनी मोदींना आपण आता शेवटपर्यंत येथेच राहु अशी ग्वाही दिली आहे.
दोन वेळा आपण इकडेतिकडे गेलो होता, पण यावेळी आता इकडेच राहु असे नितीशकुमार मोदींना म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत तेजस्वी यादव यांनी हा टोला लगावला.