Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीसाठी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तसेच शिंदे गटानेही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट कुठल्या मतदार संघात थेट लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर शिंदे गट आणि ठाकरे गटाने यादीत काही मतदार संघातील उमेदवारी जाहीर केलेली नाही. महायुतीत कल्याण लोकसभेच्या जागेसाठी रस्सीखेच सुरु आहे. अशी चर्चा सुरु आहे तर ठाकरे गटानेही या मतदारसंघातून उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. अशात अशी माहिती सामोर येत आहे की, ठाकरे गट कल्याण मतदार संघातून लोकसभेच्या जागेसाठी एका मातब्बर आणि स्थानिक पातळीवरच्या लोकप्रिय चेहऱ्याला उमेदवारी देणार आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष भोईर हे इच्छुक असल्याची माहिती समोर येत होती. पण आता कल्याणमधून आणखी एका नावाची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘शिवसेना ठाकरे गट कल्याण लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे नेते सुधीर पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.’
Lok Sabha Election 2024 । कोण आहे सुधीर पाटील ?
-कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष वंडार पाटील यांचे सुधीर पाटील चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार गट ) ठाणे जिल्ह्याचे सुधीर पाटील अध्यक्ष आहे.
-सरपंच, पंचायत समिती सदस्य अशा अनेक पदांचा पदभार त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळला आहे. एक सुशिक्षित, युवा, कार्यक्षम, आगरी चेहरा, सामान्यांची जाण असणारे उमेदवार म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.
-सुधीर पाटील यांच्या नावाला प्रचंड लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेची निवडणूक अतिशय लक्ष वेधणारी असणार आहे.
दरम्यान, कल्याण येथे वंडार पाटील यांची मोठी ताकद आहे. त्यांची कल्याणमधील नागरिकांमध्ये चांगली प्रतिमा आहे. याशिवाय त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे सुधीर पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाली तर त्याचा आपोआप फायदा लोकसभा निवडणुकीत बघायला मिळू शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचले का ? सुषमा अंधारे बोलून गेल्या,’ठाण्यातून PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू’