BJP-Shiv Sena meeting । लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा तिढा काही केल्या सुटत नाही. त्यासाठी रोज बैठका अन् चर्चांवर जोर देण्यात येतोय. त्यासाठी दिल्लीची ताकददेखील लावली जात आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबतमहायुतीची बैठक पार पडली. मात्र यातही काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता पुन्हा राज्यस्तवर चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. त्यातच काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गटातील मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यात काल रात्री वर्षावर चर्चा झाली. वाद असणाऱ्या जागांवर ही चर्चा झाली. त्यात छत्रपती संभाजी नगर, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येतंय.
पालघरमध्ये भाजपच्या चिन्हावर गावित BJP-Shiv Sena meeting ।
सर्वात अगोदर बैठकीत पालघर जागेबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येतंय. आता पालघरमध्ये शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. यामुळे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत वर्षावर चर्चा केल्याचं म्हटलं जातंय. त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभेच्या जागेसाठी चर्चा झाली. मंत्री उदय सामंत त्यांच्या भावासाठी या जागेचा आग्रह करीत आहे. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे आम्हाला ही जागा दिली तर आम्ही ती जागा जिंकून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त बैठकीत व्यक्त केला.
विनोद पाटील शिवसेनेकडून? BJP-Shiv Sena meeting ।
संभाजीनगर बाबत एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी खेळी खेळली जात असल्याचे दिसतंय. एकीकडे मराठा समाज स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे मराठा नेते आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. ते शिंदे गटाकडून संभाजीनगर जागेसाठी इच्छुक आहेत. पण भाजपसुद्धा या जागेवर निवडणुक लढवण्यास आग्रही असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येतीय.
ही बातमी वाचा
मोठी बातमी ! मराठा समाजाचा सर्वात चर्चित उमेदवारच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; काय आहे भेटीचं कारण ? वाचा सविस्तर