मुंबई – जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्सला सुरुवात झाली आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेक बड्या स्टार्सच्या लूकने रेड कार्पेटवर आग लावली. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील या फेस्टिव्हलची हजेरी लावली. कान्समध्ये पहिल्या दिवशी उर्वशी गुलाबी रंगाच्या फ्युरी ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली.
कान्स चित्रपट महोत्सवाची एक वेगळी ओळख आहे. या फेस्टिवलला जगभरातील कलाकार येतात आणि आपलं वेगळेपण दाखवतात. उर्वशीने देखील रेड कार्पेटवर जात अनेकांना आपल्या सौंदर्याची भुरळ पाडली. तिच्या बहुरंगी नेकलेसनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले होते, ज्यासाठी अभिनेत्री चांगलीच ट्रोल देखील झाली.
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये आलेली उर्वशी रौतेला खूपच सुंदर दिसत होती. चाहत्यांना तिचा लूक खूप आवडला आणि अभिनेत्रीचे खूप कौतुकही झाले. एखाद्या बाहुलीप्रमाणे ड्रेसिंग करून आलेल्या उर्वशीचा लूक चांगलाच लक्षवेधी ठरला. ड्रेस पेक्षाही तिच्या नेकलेसची अदा पाहून ट्रोलर्सही चक्रावले. कारण उर्वशीने गळ्यात थेट मगरीच्या आकाराचा नेकलेस घातला होता.अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
उर्वशी रौतेलाच्या लूकवर कमेंट करताना एका युजरने म्हटले आहे की, जर गळ्यातील मगर जिवंत झाली तर ती फोटोशूट सोडून पळून जाईल. दुसरा युजर म्हणाला तू खूप सुंदर आहेस मग मगर कशाला ? अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
उर्वशी रौतेलाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर उर्वशीने हिंदीसोबतच कन्नड, बंगाली, तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.तसेच उर्वशी परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये देखील झळकणार आहे. तसेच करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन सोबत देखील उर्वशी एक प्रोजेक्ट करत आहे.