मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या खूप चर्चेत आहे. पण यावेळी ती एखाद्या क्रिकेटरमुळे नाही तर तिच्या केसांमुळे चर्चेत आली आहे.प्रियांका चोप्रा, मंदाना करीमी यांसारख्या अभिनेत्रींनंतर आता उर्वशी रौतेलाने इराणी महिलांना पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी तिने आपले केस कापले आहेत. याबतचे फोटो देखील तीन आपल्या सोशल मीडियावरून प्रसारित केले आहे.
इराणमध्ये सुरू झालेल्या हिजाब लढ्यात आता जगभरातून महिलांना पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर सर्वसामान्य लोक तिथल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत व्हिडिओ शेअर आहेत.आता उर्वशी देखील या लढ्यात सामील झाली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री जमिनीवर बसून केस कापताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी माझे केस काढत आहे’ इराणमधील अटक केलेल्या त्या मुलीला,महिलांना ज्यांना आंदोलनादरम्यान जीव गमवावा लागला तसेच उत्तराखंडची रहिवासी 19 वर्षीय अंकिता भंडारीला माझा पाठिंबा दर्शविण्यासाठी मी माझे केस कापले आहे.
View this post on Instagram
उर्वशी रौतेलाने लिहिले, ‘केस हे महिलांच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. सार्वजनिक ठिकाणी केस कापून, स्त्रिया हे दाखवत आहेत की त्यांना समाजाच्या सौंदर्य मानकांची पर्वा नाही आणि ते कसे कपडे घालतात किंवा कसे वागतात हे ठरवू देत नाहीत. जेव्हा स्त्रिया एकत्र येतात आणि एका स्त्रीचा प्रश्न हा संपूर्ण स्त्री जातीचा प्रश्न मानतात. आता स्त्रीवादात नवी ताकद येईल.