मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये दिसली होती. यावेळी उर्वशीने आपल्या हटके अदांनी सर्वांना घायाळ केले होते. आता उर्वशी आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. उर्वशी लवकरच अभिनेत्री परवीन बाबी यांच्यावरील बायोपिकमध्ये झळकणार आहे. उर्वशीने सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही अपडेट दिली आहे.
अभिनेत्री परवीन बाबीने बॉलिवूड चांगलेच गाजवले होते. परवीन या सिनेमांसोबतच त्यांच्या अफेअरमुळे इंडस्ट्रीमध्ये चांगल्याच चर्चेत होत्या. त्यांनी आपल्या राहत्या घरी सुसाईड केल्याने एकच खळबळ उडाली होती. आता त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच येणार आहे. त्यासंबंधीची पोस्ट उर्वशी रौतेलाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
परवीनने 1972 साली मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर लगेच 1973 मध्ये त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘चरित्र’ या चित्रपटातून केली. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. प्रोफेशनल लाईफसोबतच परवीन त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही अधिक चर्चेत होत्या. त्या काळात अभिनेत्रीचे नाव अनेक स्टार्सशी जोडले गेले होते.आता उर्वशी या बायोपिकमध्ये नेमकी कोणाची भूमिका साकारणार हे अद्याप कळू शकलेलं नाही.
View this post on Instagram
वसीम एस कान दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव अजून ठरलेले नाही. त्याची कथा धीरज मिश्रा यांनी लिहिली आहे. उर्वशीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटाच्या कथेची स्टोरी लाईन पाहायला मिळत आहे.’नव्या सुरुवातीवर विश्वास ठेवा’ अशा कॅप्शनखाली उर्वशीने ही पोस्ट शेअर केली आहे.