urvashi rautela – एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी (INDvPAK Match) होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विश्वचषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील हा आठवा सामना आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तानमधील महामुकाबला (INDvPAK Match) पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल झाले आहेत. भारतात क्रिकेट आणि बॉलिवूडच खास नात आहे. भारताच्या अनेक स्टार क्रिकेटर्सनी बॉलिवूडच्या प्रसिद्ध हिरॉइन सोबत लग्न केली आहेत.
हा सामना पाहण्यासाठी आज अभिनेत्री अनुष्का शर्मा, सलमान खान, सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध गायक अर्जित सिंह अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान, या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री ‘उर्वशी रौतेलाने’ ही (urvashi rautela) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये चक दे इंडिया.! गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
उर्वशी रौतेला अनेकदा टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर फॅन्स तुफान कमेंट करताना दिसत आहे. या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उर्वशी (urvashi rautela) कमालीची हॉट दिसत आहे.