मुंबई – जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्सला सुरुवात झाली आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेक बड्या स्टार्सच्या लूकने रेड कार्पेटवर आग लावली. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील या फेस्टिव्हलची हजेरी लावली. कान्समध्ये पहिल्या दिवशी उर्वशी गुलाबी रंगाच्या फ्युरी ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली. उर्वशीने यावेळी घातलेला नेकलेस देखील चर्चेत चांगलाच चर्चेत आला होता. आता उर्वशीने घातलेल्या या दोनशे कोटी रुपयांच्या नेकलेसची किंमत वाढली आहे.
कान्स चित्रपट महोत्सवाची एक वेगळी ओळख आहे. या फेस्टिवलला जगभरातील कलाकार येतात आणि आपलं वेगळेपण दाखवतात. उर्वशीने देखील रेड कार्पेटवर जात अनेकांना आपल्या सौंदर्याची भुरळ पाडली. तिच्या बहुरंगी नेकलेसनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. या नेकलेसची किंमत तब्बल दोनशे कोटी असल्याचे समोर आले होते.
प्राण्याच्या आकाराप्रमाणे असलेल्या या नेकलेसची किंमत आता चांगलीच वाढली आहे. उर्वशीच्या टीमने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये उर्वशीने परिधान केलेल्या या नेकलेसची किंमत दोनशे कोटींहून 276 कोटी इतकी म्हणजेच तब्बल 76 कोटींनी वाढली आहे. अभिनेत्रीप्रमाणे कान्स फेस्टिव्हलमध्ये या नेकलेसची देखील चांगलीच चर्चा होती.
उर्वशीने परिधान केलेला हा नेकलेस फ्रेंच लक्झरी फर्म कार्टियरने या कंपनीने बनवला होता. हा नेकलेस पहिल्यांदा 2018 साली मध्ये सादर करण्यात आला होता. या नेकलेसमधील फक्त एक मगर बनवण्यासाठी हजाराहून अधिक फॅन्सी पिवळे हिरे वापरण्यात आले आहेत. तसेच यामध्ये थोड्या प्रमाणात सोन्याचा देखील वापर करण्यात आला होता.