Live Cricket Score, RR vs DC Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 चा नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला.
आयपीएल 2024 च्या 9व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. राजस्थानसाठी प्रथम रियान परागने 84 धावांची नाबाद खेळी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी आपले काम चोख बजावत शानदार विजय मिळवला. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव आहे.
प्रथम खेळताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 185 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 5 विकेट्सवर केवळ 173 धावा करता आल्या.
दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावा करायच्या होत्या, पण आवेश खानने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या संघाला 12 धावांनी विजय मिळवून दिला. दिल्लीसाठी ट्रस्टन स्टब्सने 23 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 44 धावा केल्या, मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या संघाने लवकर 2 गडी गमावले असले तरी ऋषभ पंत आणि डेव्हिड वॉर्नरच्या 67 धावांच्या भागीदारीने संघाने पुनरागमन केले होते. शेवटच्या 5 षटकात दिल्लीला विजयासाठी 66 धावांची गरज होती, मात्र संघाचे फलंदाज बाद होत राहिले. त्यामुळे दिल्लीने हा सामना 12 धावांनी गमावला
तत्पूर्वी,या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण वाटत होते, तरीही राजस्थानने 20 षटकांत पाच गडी गमावून 185 धावापर्यंत मजल मारली. राजस्थानने 36 धावांच्या स्कोअरवर 3 विकेट गमावल्या होत्या, पण अशा परिस्थितीत रियान परागने अर्धशतक झळकावून संघाला संकटातून वाचवले. रियान परागने 45 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. दरम्यान, रविचंद्रन अश्विननेही 19 चेंडूत 3 षटकार लगावत 29 धावांची शानदार खेळी केली. राजस्थानने शानदार फलंदाजी करत शेवटच्या 5 षटकात 77 धावा केल्या.
यशस्वी जैस्वाल पहिल्याच चेंडूपासून अडचणीत दिसला आणि केवळ 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जोस बटलरची बॅट सलग दुसऱ्या सामन्यात शांत राहिली, त्याने केवळ 11 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनला सुरुवात निश्चितच मिळाली, पण 14 चेंडूत केवळ 15 धावा करून तो बाद झाला. रविचंद्रन अश्विन आणि रियान पराग यांच्यातील 54 धावांच्या भागीदारीने आरआरसाठी निश्चितच पुनरागमन केले.
IND vs PAK : …तर भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका ऑस्ट्रेलियात होणार
15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 108 धावा होती, मात्र शेवटच्या 5 षटकांत रियान परागने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 5 षटकात एकूण 77 धावा काढल्या. त्याच्यासोबत शिमरॉन हेटमायरनेही 7 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 14 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात एनरिक नॉर्टजेने 25 धावा दिल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या 185 पर्यंत पोहोचली.
दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी घेतल्या विकेट...