IPL 2024 , Mumbai Players Photo with Mystery Girl : आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघ संघर्ष करताना दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा स्थितीत खेळाडूंना टीकाकारांचा सामना करावा लागत आहे.
याच दरम्यान, सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यात एक सुंदर तरूणी (मिस्ट्री गर्ल) एमआय प्लेयर्ससोबत दिसत आहे. या तरूणीची ओळख जाणून घेण्यासाठी मुंबईचे चाहते आतुर झाले आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्यासोबत दिसणाऱ्या या मिस्ट्री गर्लची ओळख जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचवेळी, पराभवानंतरही हसत-हसत फोटो काढल्याबद्दल चाहते खेळाडूंबद्दल नाराजी देखील व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर फोटो व्हायरल..
सेजल जायसवाल ( Sejal Jaiswal ) असे या मिस्ट्री गर्लचे नाव आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक रील शेअर केली आहे. यामध्ये ती मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंसोबत फ्लाइटमध्ये क्लिक करताना दिसत आहे. कधी सेजल ( Sejal Jaiswal ) रोहित शर्मासोबत तर कधी टीमचे बॉलिंग कोच लसिथ मलिंगासोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. या रीलमध्ये टीम डेव्हिड, पियुष चावला, तिलक वर्मा यांच्यासह सर्व MI खेळाडूंचा समावेश आहे. या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचे फक्त मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबतच नव्हे तर इतर संघाच्या खेळाडूंसोबत देखील फोटो पाहायला मिळतात.
कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?
सेजल जायसवाल ( Sejal Jaiswal ) ही एक अभिनेत्री आहे. याआधी ती फिजिओथेरपिस्ट होती. ‘दिल मांगे मोर’ आणि ‘डेटिंग इन डार्क’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये ती दिसली आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. ती मुंबई इंडियन्सची खूप मोठी फॅन आहे, याचा अंदाज या फोटोंवरून लावता येतो. तिने तिच्या पोस्टमध्ये मुंबई इंडियन्स तसेच विविध खेळाडूंना टॅग देखील केले आहे.
हार्दिकला आतापर्यंत मुंबईला एकही विजय…
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली, संघाने IPL 2024 चा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला ज्यामध्ये MI सहा धावांनी पराभूत झाला. यानंतर स्पर्धेतील आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईचा 31 धावांनी पराभव केला. सध्या संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. आता मुंबईचा तिसरा सामना 1 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.