पावसाळापूर्व सोपस्कार; वाहतूक पोलिसांचा पुढाकार, पण पालिकेचा प्रतिसाद मिळणार का?
पुणे – ऐन पावसाळ्याच्या तोंडावरदेखील रस्ते दुरुस्ती न झाल्याने सोमवारच्या (दि.29जून) पावसाने शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यावर आता पोलिसांनी महापालिकेकडे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी पाठवली आहे.
पावसाचे पाणी साचून अनेक ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते. यावर खड्डे बुजवून आणि साचलेल्या पाण्याला मार्ग काढून निचरा होणे आवश्यक असते. मागील वर्षी देखील या प्रकारची यादी पोलिसांनी महापालिकेला दिली होती. यंदाच्या यादीमध्ये मागील वर्षी यादीतील सुमारे 21 ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे यंदादेखील या ठिकाणांचे काम होणार का, याबाबत साशंकता आहे.
पाणी साचणारी ठिकाणे
डेक्कन – जंगली महाराज रस्ता, फर्गसन कॉलेज रस्ता, आपटे रस्ता, कर्वे रस्ता
शिवाजीनगर – गणेश खिंड रस्ता, मॉडर्न कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता
कोथरूड – महादेव मंदिर, आठवले चौक
वारजे – राजाराम पूल (वारजेकडील बाजूस कर्वेनगर), ईस्माईल बेकरीसमोर, हायवे ब्रीजखाली (वंडर फ्युचरासमोर, सिंहगड कॉलेजसमोर)
समर्थ – पॉवर हाऊस चौक
कोरेगाव पार्क – एबीसी फार्म चौक, सेंट मिराज कॉलेज जवळ,
स्वारगेट – जेधे चौक, व्होल्गा चौक. डायसप्लॉट चौक, मार्केटयार्ड चौक
दत्तवाडी – ना.सी.फडके चौक. ब्रह्मा हॉटेल चौक, राजाराम पूल, वडगाव पूल, धायरीफाटा चौक
सहकारनगर – शारदा आर्केड चौक
भारती विद्यापीठ – कात्रज दूध डेअरी, के.के.ट्रॅव्हल्ससमोर, बीआरटी मार्ग, धनकवडी फाटा ते अहिल्यादेवी चौक
चतु:शृंगी – औंधगाव, वेताळबाबा चौक, ब्रेमेन चौक, सेनापती बापट जंक्शन, सिंध हौसिंग सोसायटी
फरासखाना – बुधवार चौक, कुंभारवेस चौक
विश्रामबाग – टिळक चौक
विमानतळ – फिनिक्स मॉल
कोंढवा – लुल्लानगर चौक
मुंढवा – रेल्वे ब्रीज-वाय जंक्शन
वानवडी-भैरोबा नाल्याजवळ, रामटेकडी चौक, खटाव बंगला चौक ते सीडीओ चौक
हडपसर – सोलापूर रस्ता (रविदर्शन), हडपसर गाडीतळ, मगरपट्टा रस्ता
मागील वर्षीची ठिकाणे यंदाही कायम
शिवाजीनगर – वीर चापेकर चौक
कोथरूड – नळस्टॉप, पौड फाटा चौक, गुजरात कॉलनी जंक्शन
समर्थ – रामोशी गेट चौक
कोरेगाव पार्क – ब्लू डायमंड चौक, मंगलदास चौक
लष्कर – खाणे मारुती चौक, लष्कर पोलीस स्टेशन चौक
स्वारगेट – ढोले पाटील चौक, वखार चौक, गंगाधाम चौक
दत्तवाडी – मित्रमंडळ चौक, दांडेकर पूल चौक
सहकारनगर – महेश सोसायटी चौक, पुष्पमंगल चौक
चतु:शृंगी – शिवाजी हौसिंग सोसायटी, अभिमानश्री चौक
वानवडी – फातिमानगर चौक, सोपानबाग चौक