घBen Stokes Smoked Cigarette World Cup Final : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इमाद वसीम सतत चर्चेत असतो. पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यात इस्लामाबाद युनायटेडकडून खेळताना इमादने 5 बळी घेतले आणि शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. पण प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे खरे कारण म्हणजे त्याची सामन्यातील चमकदार कामगिरी नसून ड्रेसिंग रूममध्ये बसून सिगारेट ओढणे हे आहे. असे करणारा इमाद हा पहिला क्रिकेटर नाही, खरेतर बेन स्टोक्सने वर्ल्ड कप फायनलमध्ये सिगारेट ओढली होती.
इमाद वसीमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो ड्रेसिंग रूममध्ये बसून सिगारेट ओढताना दिसत आहे. पाकिस्तान लीग फायनलच्या पहिल्या डावात इमाद वसीमने गोलंदाजी करताना 5 विकेट घेतल्या आणि षटकांचा कोटा पूर्ण केल्यानंतर तो काही वेळ ड्रेसिंग रूममध्ये गेला. यावेळी त्यांनी सिगारेटचे काही पफ ( puff ) घेतले. दरम्यान, उत्कृष्ट कामगिरीसाठी इमाद वसीमला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.
बेन स्टोक्सने वर्ल्डकप फायनलच्या मध्यावरच केली होती सुरुवात…
2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना अतिशय रोमांचक होता, जिथे दोन्ही संघांनी 50-50 षटके खेळून 241 धावा केल्या. यानंतर सुपर ओव्हर झाली आणि तीही अनिर्णित राहिली. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्सने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 84* (98 चेंडू) धावा केल्या. यादरम्यान त्याने सुमारे अडीच तास फलंदाजी केली.
यानंतर बेन स्टोक्स सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आला. पण सुपर ओव्हरपूर्वी त्याने स्वत:ला शांत करण्यासाठी सिगारेट ओढली. ‘मॉर्गन मेन : द इनसाइड स्टोरी ऑफ इंग्लंड्स राईज फ्रॉम क्रिकेट वर्ल्ड कप ह्युमिलेशन टू ग्लोरी’ ( Morgan’s Men: The Inside Story of England’s Rise from Cricket World Cup Humiliation to Glory) या पुस्तकात स्टोक्सच्या सिगारेट ओढण्याचा खुलासा झाला आहे.
पुस्तकात सांगण्यात आले आहे की, “सुपर ओव्हरपूर्वी ड्रेसिंग रुममधील वातावरण खूपच तंग होते. सुपर ओव्हरच्या आधी शांत होण्यासाठी स्टोक्स ड्रेसिंग रूमच्या मागे शॉवरच्या भागात गेला आणि त्याने सिगारेट ओढली.