Dhoni rahul gandhi rajnath : संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची उपहासात्मक तुलना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याशी केली. धोनी क्रिकेटमधील, तर राहुल राजकारणातील बेस्ट फिनिशर आहेत, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
मध्यप्रदेशातील भाजपच्या विविध प्रचारसभांत शनिवारी राजनाथ सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राहुल यांना टीकेचे लक्ष्य केले. देशातील राजकारणात एकेकाळी कॉंग्रेसचा वरचष्मा होता. मात्र, आता त्या पक्षाची दोन ते तीन छोट्या राज्यांत सत्ता आहे. असे का घडले याचा विचार करतो; तेव्हा मी एका निष्कर्षापर्यंत पोहचतो, असे म्हणत त्यांनी उपस्थितांना क्रिकेटमधील बेस्ट फिनिशर कोण, असा प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांमधून धोनी असे उत्तर आले.
धोनीप्रमाणे राजकारणातील बेस्ट फिनिशर कोण असे विचारल्यावर मी राहुल असे उत्तर देईन. त्यांच्यामुळे अनेक नेते कॉंग्रेसमधून बाहेर पडले. कॉंग्रेस संपेपर्यंत थांबणार नाही असा निर्धार राहुल यांनी केला आहे, असे राजनाथ म्हणाले. | Dhoni rahul gandhi rajnath
कॉंग्रेस आणि भ्रष्टाचाराचे नाते अतूट आहे. मैंने प्यार किया या चित्रपटातील तु चल मैं आयी या गाण्यासारखे ते नाते आहे. कॉंग्रेसच्या बहुतांश सरकारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कुठल्या मंत्र्यावर तशा स्वरूपाचे आरोप झाले नाहीत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. | Dhoni rahul gandhi rajnath