क्विटो, (मेक्सिको) – इक्वाडोरबरोबरचे सर्व संबंध मेकिस्को तोडून टाकणार असल्याचे मेक्सिकोचे अध्यक्ष एँन्द्रीस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी म्हटले आहे. इक्वाडोरच्या पोलिसांनी क्विटो शहरातील मेक्सिकोच्या दूतावासावर छापा घातल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
इक्वाडोरचे माजी उपाध्यक्ष जॉर्ज ग्लास यांनी मेक्सिकोच्या दूतावासामध्ये राजकीय आश्रय मागितला होता. ते या दूतावासामध्येच लपून बसले असल्याच्या संशयावरून इक्वाडोरच्या पोलिसांनी या दूतावासावर छापा घातला होता. या मुद्यावर दोन्ही देशांमधील उच्चस्तरिय राजकीय मतभेद विकोपाला गेले आहेत.
इक्वाडोरचे माजी उपाध्यक्ष ग्सास यांच्यावर भ्रष्टाचार, लाचखोरी आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. इक्वाडोरमधील तपास यंत्रणांनी त्यांच्याविरोधात शोध मोहीम सुरू केली आहे.
इक्वाडोरसाठी ग्लास हे सध्या मोस्ट वॉन्टेड आहेत. त्यांच्या शोधासाठी इक्वाडोरच्या पोलिसांनी क्विटो शहरातील मेक्सिकोच्या दूतावासात घुसून बळजबरीने ग्लास यांना ताब्यात घेतले.
इक्वाडोर हा एक सार्वभौम देश असून राजधानीतील एखाद्या देशाच्या दूतावासात कोणीही गुन्हेगाराने आश्रय घेतल्याचे खपवून घेतले जाणार नाही, असे अध्यक्षांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ग्लास यांना आपल्या दूतावासातून ताब्यात घेतले गेल्यावर मेकिस्कोचे अध्यक्ष ओब्राडोर यांनी संताप व्यक्त केला.
या घटनेत अनेक मुत्सद्दी जखमी झाले आणि त्यांनी राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कन्व्हेन्शनचे उल्लंघन केले असल्याचे मेक्सिकोच्या परराष्ट्र संबंध सचिव एलिसिया ब्रसेना यांनी देखील म्हटले आहे.
एक दिवसापूर्वी, मेक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर यांनी इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ जिंकलेल्या शेवटच्या निवडणुकांबद्दल इक्वाडोरसाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचे विधान केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला.